Ajirn | अजीर्ण

अजीर्ण



  • निलगिरी तेलाचे ४/५थेंब साखरेत घ्यावे,
  • सुंठ व साखर वा गूळ मिसळून त्याची सुपारीएवढी गोळी खाणेअथवा अर्धा चमचा सुंठ व अर्धा चमचा साखर अर्ध्या लिंबाच्यारसात किंवा अर्धा चमचा तुपात कालवून खावे. ३. सहा काळ्या मनुका व दोन काळे मिरे सकाळ-संध्याकाळ चावूनखाणे. दोन दिवसांत आराम पडेल.
  • चांदाकोताचे बी ताकात किंवा पाण्यातून चमचाभर उगाळून देणे.
  • हिंगाष्टक चूर्ण : सुंठ, मिरी, पिंपळी, ओवा, सैंधव, जिरे, शहाजिरे,हिंग हे सर्व समभाग घेऊन चूर्ण करावे वचमचाभर चूर्ण ताकातून किंवा तूपभाताशी कालवून खावे.
  • हिंगाष्टक ( दुसरा प्रकार ): हिंग एक तोळा, बिडलोण दोन तोळे, मिरी, सैंधव, सुंठ, पिंपळी, जिरे, ओवा, अजमोदा, शहाजिरे, बेहडेदळ हे सर्व पदार्थ प्रत्येकी चार चार तोळे, सोनामुखी,आवळकाठी प्रत्येकी आठ तोळे, बोर व कवठ याचा गर प्रत्येकी सोळा तोळे, सर्वांचे मिसळून चूर्ण करणे व अर्ध्या लिंबाच्या रसात चमचाभर चूर्ण घालून द्यावे. अपचन, बद्धकोष्ठता, पोटातील वारा यावरही गुणकारी.
  • किरी, ओवा, अश्वगंध, मर्गदुधनीचे फळ, खसखस, सालममिसरी, पंजाबी मिसरी, गवाक्षर, खिसमिस हे सर्व एकएक तोळा,गोरोचन पाव तोळा, केशर दोन आणे भार, मिरी, सुंठ अर्धा तोळा. या सर्व वस्तूंचे चूर्ण करावे व अर्धा चमचा चूर्ण पाण्यातून द्यावे.


अग्निमांद्य अपचन


  • उकडून खाणे. सुंठ, आले व धणे यांचा काढा घेणे. ऑस्ट्रेलियन चेस्टनटचे बी खरपूस लागते म्हणून जास्त खाऊ नये. म्हाताऱ्या माणसांनी खाऊ नये. ३. आले किसून घेऊन गुळात व साखरेत पाकविणे. यात कागदी लिंबाचा रस घालणे. सकाळ-संध्याकाळ बारीकबोराएवढी गोळी घेणे.

अजीर्णामुळे ताप आला तर...


  • आल्याचा तुकडा पैशाएवढा, गवती चहाची चार पाने, अर्धा चमचा ओवा, सर्व ठेचून दोन कप पाण्यात आटवून दीड कप करावे व दिवसातून दोन-चार वेळा द्यावे.

अरुचि


  • गुळवेल, पित्तपापडा, नागरमोथा, किराईन, सुंठ एकेक तोळा घेऊन सर्वांचे चूर्ण करावे. कपभर पाण्यात चमचाभर चूर्ण टाकून अर्धा कप होईपर्यंत आटवणे व सकाळी व संध्याकाळी जेवणाआधी अर्धा तास सात ते पंधरा दिवस देणे.
Previous Post Next Post