अतिसार
- दुधाणी अगर नायटी या वनस्पतीच्या तीन-चार फुलांचे गेंद व ओल्या अगर सुक्या कोवळ्या डाळिंबाच्या सालीचा अर्धा इंच तुकडा दिवसातून दोन-तीन वेळा चावून खाणे. हे अतिसारावर रामबाण औषध आहे.
- गोरखचिंचेचे चूर्ण अर्धा तोळा घेऊन पाण्यात घालून देणे.
- एकतोळा आवळकाठी, पाव तोळा काळी मिरी, तेवढेच जिरे, अर्धा तोळा सैंधव ह्या सर्वांचे चूर्ण करावे. चमचाभर चूर्ण ताकाच्या निवळीतून जेवणाआधी दिवसातून एकदा घेणे.
- छटाक मधात दोन तोळे आल्याच्या चकत्या घालून शिजवाव्यात. त्यात पाव तोळा पिंपळीचे चूर्ण घालावे. मिश्रणातला चमचाभर मध व एक-दोन चकत्या दुपारचे जेवणाचे आधी अर्धा तास व रात्री निजताना असे दोन वेळा खाणे.
- पाव जायफळ किसून किसाचे दोन भाग करावेत. एका भागाइतकाओला नारळ घालून दिवसातून दोन वेळा घेणे,
- पाण्यात उगाळलेले जायफळ, तेवढीच गाळलेली मुंठएक चमचा तुपात थोडी साखर घालून शिजवणे व दिवसातून दोन-तीन वेळा चाटणे,
- आल्याचा रस चमचाभर मधातून देणे,
- मोगली एरंडाची साल पैशापबढी, मिऱ्याचे दाणे सात, दोन लहानसे लसणीचे कांदे सोलून, दोन लाल मिरच्या, चार आमसुले, अर्धा चमचा मीठ, सर्व एकत्र कुटून तीन गोळ्या कराव्या, एका गोळीने परसाकड थांबली नाही तर तासाभराने दुसरी व नंतर तिसरी गोळी घ्यावी.
- गबती चहाची दोन पाने, पैशाएवढा आल्याचा तुकडा घेऊन एक टेबलस्पून गरम पाणी घालून ठेचून रस काढावा व साखर घालून प्यावा.
खाल्लेलं पचत नसल्यास व वारंवार अतिसार होत असल्यास
कपभर माक्याचा रस, मूठभर सोललेली लसूण, पावशेर खडीसाखर, तिन्ही एकत्र करून गोळीबंद पाक करावा. रोज सकाळी वालाइतक्या पाकाचे चाटण अर्धा चमचा तूप घालून खावे व वर दूध प्यावे. महिनाभर हा उपाय करावा,
वरीलपैकी कोणतेही उपाय अतिसारावर चालू करताना पातळ ताक भरपूर प्यावे. मधून मधून साखर व मीठ घालेले लिंबूपाणी प्यावे. मात्र हे पाणी उकळून गाळलेले असावे.
लहान मुलांचा अतिसार
- डाळिंबाची सहा-सात कोवळी पाने औंसभर पाण्यात शिजवून पाणी गाळून त्यात दूधसाखर घालून द्यावे.
- चिंचोक्याएवढी डाळिंबाची साल व चिमटीभर भाजलेल्या जिऱ्याची भुकटी यांचाही वरीलप्रमाणे काढा करून द्यावा.
ज्वरातिसारावर
पिंपळी, अतिविष, नागरमोथा, काकडशिंगी यांचे समभाग वस्त्रगाळ चूर्ण करून गुंजभर चूर्ण मधातून दिवसातून तीन वेळा चाटवणे. मोठ्या मुलांस ३ ते ४गुंजापर्यंत देणे.