Amlapitt| आम्लपित्त

आम्लपित्त

  • गोरखचिंचेचे चूर्ण पाव तोळा घेऊन, त्यात साखर घालून दिवसातून दोन वेळा महिनाभर देणे.

आंबट करपट ढेकर येणे

  • लांब पिंपळी मधात उगाळून एक चवलीभार देणे,

आगपेण

  • आकाशवेलीच्या काड्या आणून त्याची राख करून गोडेतेलात खलून लावणे.
  • काळे दांतवळ पाण्यात खलून लावणे.

इसब

  • आंबट दही घेऊन त्यात मूठभर भात कालवावा. तो एका तांब्याच्या तांबलीत घालून ती तांबली एका पातेल्यात ठेवावी. तांबलीच्या गळ्यापर्यंत येईल इतके पाणी पातेल्यात टाकावे. नंतर पातेले उकळवावयास ठेवणे. गरम भात पानावर काढून गरम असतानाच रात्री झोपतेवेळी इसबावर बांधावा. सकाळी उठल्यावर कडूनिंबाच्या काढ्याने धुवून काढावे व बोरीक पावडर टाकावी. ओला वा सुका इसब बरा होतो.
  • पांढऱ्या कण्हेरीचे मूळ उगाळून त्याचा लेप इसबावर लावावा.
  • रानजाईच्या ओल्या पाल्याचा रस व चुरा इसबावर बांधावा. त्यानेतो भाग उफलून येतो व पाणी जाऊन पाय बरा होतो.
उपाय जालीम आहे. तेव्हा सावधगिरीने करावा.

एन्फ्लूएंझा


  • शहाळ्याचे पावशेर पाणी अनशापोटी पिणे. याने बेरीबेरी, फ्ल्यू, मेंदूचा बिघाड व मलेरियाचा फिकेपणा जातो.
  • साथीमध्ये नाक व घसा मिठाच्या पाण्याने साफ करावा.
  • रोगी माणसाचे जवळ जाताना निलगिरी तेलाचे कपड्यावर शिंतोडे उडवावेत.

उवा

  • दोन शेर पाण्यात एक चमचा कडक फिनेल घालून एक फडके त्यात बुडवून ठेवावे. तेच फडके रात्री झोपताना डोक्याला बांधून झोपणे. सकाळी केस धुवावेत.
  • कडुनिंब, सिताफळाचे बी व पाने वाटून डोक्यास लावावीत. सकाळी नहावे.
  • टपैंटाईन तेल केसास लावून रात्री फडके बांधून ठेवावे. सकाळी न्हावे.
  • रॉकेलमध्ये कापूर खलून रात्री डोक्यास लावावा. सकाळी नहावे.

उंदराचे विष

  • खवट खोबरे मुळ्याच्या रसात उगाळून दंशावर लावावे.
  • मांजराचा दात उगाळून लावणे.

उतणे


  • पळसाचे बी वाटून लावणे.
  • बिळ्याचा रस लावणे.
  • फार उतल्यास एकदांडीच्या पाल्याचा रस काढून पानाचा चोथा उतल्या जागेवर बांधावा.
  • प्रथम उतलेल्याचे फोड फोडून आतील पाणी काढून टाकावे.

एरंडेल घेण्यावर


  • प्रथम कागदी लिंबाची फोड जिभेने चोखावी वा जिभेवर चोळावी. त्यावर एरंडेल घेतल्यास चवही लागत नाही व वासही येत नाही.
  • एरंडेल घेतल्यानंतर ताकाच्या गुळण्या कराव्या.

.
Previous Post Next Post