Aanch, aamansh, rakti, | आंच, आमांश, रक्ती शेम पडणे

आंच, आमांश, रक्ती शेम पडणे


  • पिकलेले वाचाळलेले बेलफळ आणून दोन तोळे मगज थंड पाण्यात त्यात साखर अर्धा तास भिजत घालणे. कोळून गाळणीने गाळून घालून पिणे. तोच चोथा परत भिजवणे व कोळून सरबतासारखा दिवसातून तीन-चार वेळा घेणे.
  • धायटीच्या फुलांची पूड २/३ गुंजाभर दह्यातून घेणे.
  • बेलफळाचा मोरंबा द्यावा.
  • बेलफळाचा गीर ( पावलीभार ), नागरमोथा व गुलाबकळी सर्व समभाग घेऊन त्याचा एक-चतुर्थांश काढा उरवावा. दिवसातून तीन वेळा घेणे.
  • सुंठीचा शिरा देणे.
  • बाळमामा फळ आंवेवर रामबाण उपाय आहे. एक फळ कपभर पाण्यात भिजत घालणे. पंधरावीस मिनिटात ते उमलते. कोळूनbसाखर घालून देणे.
  • सबजाचे चमचाभर बी अर्धा कप पाण्यात दोन तास भिजवून दूधसाखर घालून देणे.
  • आवळीकाताची पूड पाव चमचा, रात्री औंसभर पाण्यात भिजवून ठेवावी व सकाळी अर्धा कप दह्यात घालून द्यावी.
  • तोंडलीच्या पानांच्या चमचाभर रसात तेवढेच गाईचे दूधव बेताची साखर घालून ताबडतोब घ्यावे.
  • एक औंस गाईच्या दुधात अर्धे लिंबू पिळून ताबडतोब घ्यावे.
  • एक औंस गाईचे दूध चांगले तापवून चिमटीभर साखर व अर्धा तोळा कोकमेल त्यात टाकणे व ते वितळताच देणे. दिवसातून दोनवेळा देणे. आंव फार पडत असल्यास तीन वेळा द्यावे. रक्त पडत असल्यास ते या उपायाने थांबते.
  • कडंबाच्या दोन गोळ्या, चार चमचे ताकात उगाळून दर दोन तासांनी दोन-दोन ह्याप्रमाणे शौचास होणे थांबेपर्यंत देणे. ताक मुबलक द्यावे. या गोळ्या तीन वर्षांखालील मुलांस एक व तीन वर्षावरील मुलांस दोन, ताकातून किंवा डाळिंबाच्या रसातून उगाळून द्याव्यात. गुण न आल्यास दोन तासांनी पुन्हा द्याव्यात.


कडंबाच्या गोळ्या तयार करण्याची पद्धत


कच्ची डाळिंबे आठ तोळे, ओवा, आले, जिरे, पांढरा किंवा काळा कात हे सर्व एकेक तोळा, सैंधव अर्धा तोळा, अफू दोन आणे भार. एक पांढरा कांदा कोरून त्यात अफू घालावी व वर त्याची चकती बसवावी. वरील सर्व जिन्नस व तो कांदा एका स्वच्छ फडक्यात बांधून वाफेवर शिजवावे. शिजल्यावर बारीक वाटून हरभऱ्याएवढ्या गोळ्या कराव्यात व उन्हात सुकवाव्यात.

  • डाळिंबाच्या झाडाची साल, कोवळे फळ, व पाने समभाग घेऊन गाईच्या दुधात वाटून दोन चमचे देणे.
  • इसबगोल व मेथी समभाग चांगले लालसर होईतो भाजून चूर्ण करावे व चमचाभर चूर्ण बेताच्या साखरेत मिसळून द्यावे. भूजपत्र व ताडपत्र समभाग जाळून राख करावी. चवलीभार
  • रेशीम, राख चमचाभर मधात कालवून द्यावी.
  • मिठातील आंब्याची किंवा उकडआंब्याची अर्धी कोय अर्धा कप ताकात वाटून, दोन गुंजा सैंधव घालून देणे.
  • पेरूच्या पानाच्या टेबलस्पूनभर रसात दोन गुंजा सैंधव घालून देणे.
  • १८. टाकळ्याचे मूळ दह्याच्या निवळीत टेबलस्पूनभर उगाळून देणे मुलांस चहाचा चमचाभर देणे.
  • कावळीचे मूळ ताकात किंवा दह्याच्या निवळीत उगाळून द्यावे. गुण न आल्यास दोन तासांनी पुन्हा देणे.
  • आवळकाठी अर्धा तोळा, डाळिंबाची साल पैशाएवढी, तेवढीच आवळिंगाची साल, कावळीची काडी वीतभर, कपभर पाण्यात पंधरा मिनिटेपर्यंत शिजवून गाळून देणे.
  • खसखस तुपात लालसर भाजून पूड करावी. दर वेळी अर्धा चमचा पूड दिवसातून तीन वेळा घेणे किंवा चमचाभर खसखस वाटून दुधात शिजवून पेज करून द्यावी.
  • जून अशा दहा बेलफळातील ( कवठ नव्हे ) गर, तेवढेच पाणी एकत्र करून शिजवावे व गाळून चोथा काढून टाकावा. पाण्याइतकीच साखर त्यात घालून पाक आणावा. दर वेळी चमचाभर पाक, दिवसातून तीन-चार वेळा घ्यावा. हा पाक पित्तावरही उपयोगी पडतो.
  • सोमारीचे मूळ तुपात उगाळून मोठ्यांस चमचाभर व लहानांस अर्धा चमचा द्यावे. हे औषध आंव, रक्ती व पांढरी या दोहोंवरही चालते. हीच मुळी वरीलप्रमाणे ताकात उगाळून दिल्यास अपचन व तजन्य आंव पडणे बंद होते.
  • शंखजिऱ्याचे चूर्ण पाव चमचा, चमचाभर लोणी साखरेत कालवून द्यावे. दिवसातून दोन-तीन वेळाही देता येते. 1
  • कुड्याचे मूळ ताकात उगाळून दर दोन तासांनी देणे.
  • वेलचीची पूड अर्धा तोळा टेबलस्पून दह्यात कालवून साखर घालून देणे.
  • अर्धा चमचा मेथ्या तोंडात टाकून वर पाणी प्यावे.
  • तांदुळजा किंवा चवळीच्या भाजीची मुळी दुधात उगाळून चमचाभर द्यावी. चवळीची कोवळी भाजी खायला द्यावी.
  • केशरादि वटी केशर, बिया काढलेल्या खारका, जायफळ प्रत्येकी अर्धा अर्धा तोळा, अफू पाव तोळा हे सर्व जिन्नस पाण्याशिवाय कुटून एकंदर नव्वद गोळ्या वळाव्यात व सावलीत वाळवाव्यात. मोठ्यांस एक ते दोन, लहानांस एक व तीन वर्षांखालील मुलांस अर्धी गोळी द्यावी. परसाकड नथांबल्यास पुन्हा चार तासांनी गोळी द्यावी.

पोटात मुरडा फार होत असल्यास...


  • तुरटी किंवा तुरटी व आंबेहळद पाण्यात उगाळून त्याची थंड पट्टी पोटावर ठेवावी.

  • केळे दह्यात कुस्करून बेंबीवर लेप लावावा. कांदा तुपात वा एरंडेलात भाजून बेंबीवर शेकावा.
Previous Post Next Post